
अकोला : दिनांक २२/१०/२०२५ रोजी सायंकाळी ०५:०० चे सुमारास अक्षय विनायक नागलकर वय २६ वर्ष हा १५ मिनीटात बाहेर जावुन येतो असे सांगुन घरून निघुन गेला होता. परंतु तो घरी परत न आल्याने दिनांक २३/१०/२०२५ रोजी पो.स्टे. डाबकी रोड येथे मिसींग क. ४४/२०२५ अन्यये हरविलेल्या इसमाची नोंद घेवुन तपास सुरू करण्यात आला होता.सदर प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने घटनेचे गांभीर्य पाहून मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्जीत चांडक यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग व स्थानीक गुन्हे शाखा यांचे चौकशी कामी पथके स्थापन करून तपासाला गती दिली होती. सदर मिसींगचे तपासादरम्यान अक्षय नागलकर यास त्याचा मित्र आरोपी आशु वानखडे याचे मोटर सायकलीवर बसुन जातांना काही लोकांनी पाहिल्याची माहिती प्राप्त झाली होती. मयत अक्षय नागलकर यारा चंदु बोरकर यांने कट रचुन साथीदारांच्या मदतीने गायगाव रोडवरील एम.एच. ३० या हॉटेलवर बोलावुन खुन केला. या माहितीवरून मयत अक्षय नागलकर यास मारण्यात सहभागी असलेले संशयीत आरोपी यांना अटक करण्यासाठी स्थानीक गुन्हे शाखेतील ४ पथके, एस.डी.पी.ओ. शहर विभाग यांचे ०२ पथक व पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील ०२ पथक असे एकुण ८ पथके तयार करून प्रकरणातील संशयीत आरोपीतांना अटक करणेकामी रवाना करण्यात आले.४८ तासात अहोरात्र परिश्रम घेवुन गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून व तांत्रीक विश्लेषणावरून संशयीत इसम १) चंद्रकांत महादेव बोरकर, वय ४१ वर्ष रा. शिवसेना वसाहत, जुने शहर, अकोला २) आशिष उर्फ आशु शिवकुमार वानखडे, वय ३८ वर्ष, रा. जुने शहर अकोला ३) श्रीकृष्ण वासुदेव भाकरे, वय ३६ वर्ष रा. मोठी उमरी अकोला ४) अशोक उर्फ ब्रम्हा पांडुरंग भाकरे, वय ४४ वर्ष रा. मोरगाव भाकरे, ता. जि. अकोला यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता ते उडवा उडवीचे उत्तरे देत होते. तांत्रीक माहिती संकलीत करून त्यांना वेगवेगळी विचारपुस केली असता त्यांनी अक्षय नागलकर याचा गायगाव रोडवरील एम.एच. ३० हॉटेल येथे जेवणाच्या बाहान्याने बोलवुन हॉटेलवे शटर बंद करून त्याचेवर गावठी पिस्टल ने व धारदार शस्त्राने वार करून जिवानिशी ठार मारले अशा ताब्यातील आरोपीतांचे कबुलीवरून मिसींगच्या चौकशी अंती पो.स्टे. डाबकीरोड येथे अप क. ३३७/२०२५ कलम १०३, (१),३२८,६१, (२) ३. (५) भा.न्या.सं. अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला व गुन्हयाचे तपासकामी वर नमुद चारही आरोपीतांना अटक करण्यात आली.त्यानंतर स्थानीक गुन्हे शाखा येथील पथकाने उर्वरीत आरोपीतांपैकी ५) रोहित गजानन पराते वय २८ वर्ष रा. गायत्री नगर, जुने शहर अकोला व ६) अमोल अजाबराव उन्हाळे वय ४४ वर्ष रा. हरीहर पेठ, जुने शहर, अकोला यांना अहिल्यानगर (अहमदनगर) येथुन अटक करण्यात आली. ७) आकाश बाबुराव शिंदे वय २५ वर्ष रा. भौरद ता. जि. अकोला यास भुसावळ जि. जळगाव येथुन अटक करण्यात आली. ८) नारायण गणेश मेसरे वय २८ वर्ष रा. लोटनापुर ता. बाळापुर जि. अकोला यास बाळापुर येथुन अटक करण्यात आली. ९) शिवहरी उर्फ शिवा रविंद्र माळी यय २५ वर्ष रा. बाकराबाद ता. जि. अकोला यास बैतुल मध्यप्रदेश येथुन अटक करण्यात आली.अशा प्रकारे सर्व आरोपी अटक झाल्याने संपुर्ण खुनाच्या घटनेचा व कशा प्रकारे प्रेताची विल्हेवाट लावली याचा उलगडा झाला. एकदंरीत सर्व आरोपीतांच्या सविस्तर विचारपुस केली असता यातील मयत अक्षय नागलकर याचा भाऊ शुभम विनायक नागलकर हा चंदु बोरकर याचे सोबत झालेल्या वादामुळे एम.पी.डी.ए. कायदयान्वये १ वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द झाला यावरून अक्षय नागलकर याने चंदु बोरकर याला धमकावले होते त्यामुळे चंदु बोरकर मागील काही महिन्यापासुन अक्षय नागलकर याचा खुन करण्याचा कट रचत होता. त्यासाठी त्याने या सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारणाने विश्वासात घेत अक्षय नागलकर याचा खून करण्यासाठी तयार केले होते. खून करण्यासाठी ब्रम्हा भाकरे याचे मार्फतीने गायगाव बंद पडलेले हॉटेल चालविण्यासाठी घेतले होते. तसेच खुन केल्यानंतर प्रेत जाळुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोरगाव भाकरे शेत शिवारातील ब्रम्हा भाकरे याचे शेतात टीन पत्राचे रूम बांधुन प्रत जाळण्यासाठी लागणारे लाकडे अगोदरच टिन पत्राचे रूमच्या मागे आणुन ठेवले होते. अक्षय नागलकर याला मारण्यसाठी हॉटेल मध्ये जेवणाच्या बहाण्याने बोलावण्याची जबाबदारी आशु वानखडे याला देण्यात आले होते. आशु वानखडे याचे अक्षय सोबत जुने वाद असल्यामुळे तो यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाला होता.यावरून गुन्हयात वाढीव कलम ३, ४, २५ आर्म अॅक्ट ची समाविष्ट करण्यात आली आहे. आरोपीतांनी हत्येनंतर मृतकाचा मृतदेह घऊन जाण्याकरीता वापरलेली एक टाटा इंडीगो कार तसेच गुन्हयात वापरलेल्या इतर ३ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीतांचे घरझडती मध्ये एकुन ७ मोबाईल आणि सहा जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत. यातील सर्व ०९ अटक आरोपी हे आज दिनांक ०१/११/२०२५ रोजी मा. विदयमान न्यायालयात हजर केले असता त्यांचा दिनांक ०५/११/२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.एकंदरीत सदर प्रकरणामध्ये यातील आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता यातील आरोपीतांनी अक्षय विनायक नागलकर याचा खुन करून त्याचे प्रेत जाळून त्याची राख नदीत फेकुन देवुन पुरावे नष्ट केल्यामुळे आपण न्यायालयातुन निर्दोष सुटुन जावु याचे नियोजन करून खुन केल्यानंतर प्रेत न मिळण्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला होता. याबाबींचा विचारत घेता मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चीत चांडक यांनी सदर गुन्हयाचे तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग श्री. सुदर्शन पाटील यांची तपास अधीकारी म्हणुन नेमणुक करून त्यांचे मदतीला पोलीस निरीक्षक शंकर शेळके, प्रभारी अधिकारी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला व स्था.गु.शा. येथील ४ पथक व पो.स्टे. डाबकीरोड येथील २ पथक नेमण्यात आले होते.तपासामध्ये घटनास्थळावरून संकलीत करण्यात आलेल्या ईलेक्ट्रॉनिक व फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारावर आरोपींना कठोर शिक्षा होईल येवढा पुरावा निष्पन्न असुन सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्जीत चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. सुदर्शन पाटील करित असुन तपासमध्ये स्था.गु.शा. प्रमुख श्री. पो.नि. शंकर शेळके, प्रभारी अधिकारी पो.स्टे. डाबकीरोड स.पो.नि. अभिषेक अंधारे, स.पो.नि. गोपाल ढोले, स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. विष्णु बोडखे, पो.उप.नि. माजीद पठाण, पो.उप.नि. अनिल चव्हान, प्रो. पो.उप.नि. योगेश चव्हानके यांचे तथा स्था. गु.शा. येथील चार पथके आणि पो. स्टे. डाबकीरोड येथील गुन्हे शोध पथक यांचे सहकार्य प्राप्त झाले.







