
दर्यापूर, (प्रतिनिधी): अमोल चव्हाण दर्यापूर नगरीच्या वैचारिक पटलावर एक महत्त्वपूर्ण घटना घडत आहे. सकल हिंदू समाज, दर्यापूर यांच्या वतीने देशभरातील लाखो तरुणांचे प्रेरणास्रोत आणि प्रखर राष्ट्रचिंतक मा. श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.येत्या ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘प्रखर राष्ट्रवाद शंखनाद’ या विषयावर ते आपले अभ्यासपूर्ण आणि ओजस्वी विचार मांडणार आहेत. दर्यापूर नगरीत प्रथमच अशा राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तिमत्त्वाचे आगमन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.या कार्यक्रमासाठी शिवाजी चौक जवळ, जिल्हा परिषद कन्या शाळा मैदान, दर्यापूर हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे.सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत राष्ट्र, धर्म आणि संस्कृतीबाबत तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी, तसेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ व्हावी, हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश आहे.सकल हिंदू समाज, दर्यापूर यांच्या वतीने सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक, विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी आणि युवा वर्गाला या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
		







