हरवलेल्या बालकाचा शोधासाठी अकोला पोलीसांची २१ दिवसांची यशस्वी शोध मोहिम…. सोलापुर जिल्हयातील पंढरपुर येथुन घेतले ताब्यात…

0
18
पथकाला पोलीस अधीक्षकांनी नाहिर केले १०,०००/रू चे रिवार्ड

अकोला प्रतिनिधी मनीष राऊत दिनांक ११/११/२०२५ रोजी सायंकाळी ०७:०० वा. दरम्यान पो.स्टे. खदान ह‌द्दीतील सरकारी गोडावुन जवळ राहणार ऋषीकेश संतोष कनोजीया, वय १४ वर्ष, रा. सरकारी गोडावुन जवळ, खदान अकोला हा त्याचे राहते घरून कुणालाही काहीही न सांगता निघुन गेला होता. त्यामुळे दिनांक १२/११/२०२५ रोजी फिर्यादी संतोष कनोजीया (वडील) यांनी पो.स्टे. खदान येथे दिलेल्या तक्रारीवरून अप क. ९३६/२०२५ कलम १३७ (२) भा.न्या.सं. नुसार गुन्हा दाखल करून तपासात घेतला.> दिनांक ११/११/२०२५ चे रात्री एका वॉटसअप ग्रुपवर एका प्रतिष्ठीत सदस्याने मिसींग बाबत माहीती शेअर करून मा. पोलीस अधिक्षक साहेब यांना मुलाचे शोधकामी वयक्तीक लक्ष घालुन टिम नेमणेबाबत विनंती केली होती.> परंतु बालकाचा शोध घेण्याकरिता आवश्यक असलेली कोणतेही पुरक माहिती पालकाकडे उपलब्ध नव्हती. बालक स्वतः मोबाईल वापरत नसल्याने व कोणत्याही व्यक्तीवर पालकांचा संशय नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती.> प्रकरणाची संवेदनशीलता पाहता स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून गोपनिय रित्या बालाकाचे वास्तव्य असलेल्या भाग शाळा, ट्युशन, घराचा परिसर ईतर ठिकाणावरून माहिती गोळा करीत होते.> १६ दिवस उलटुनही बालकाचा शोध लागत नसल्याने बालकाचे आई-वडील हे मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला यांना प्रत्यक्ष भेटुन १ तास चर्चा करून मुलाचा शोध घेण्याची विंनती केल्याने, सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक सा. अकोला यांनी मा.एस.डी.पी.ओ. शहर विभाग आणि पो.नि. स्था.गु.शा. अकोला यांना नमुद मुलाचा तात्काळ शोध घेण्याच्या सुचना दिल्या.> स्था.गु.शा. पथकाने आईवडीलांना सोबत घेवुन सविस्तर चर्चा करून वेगळया मार्गाने पुन्हा सिसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता, त्यामध्ये स्था.गु.शा. अकोला पथकाला सदर बालक हे दिनांक ११/११/२०२५ रोजी प्लॅटफॉर्म नं. ३ रेल्वेस्टेशन अकोला वरून रात्री ०८:०० वा. रेल्वे क. ११४०३ अकोला ते कोल्हापुर या रेल्वेमध्ये बसुन जातांना दिसुन आला सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक साहेब यांना देण्यात आली.> मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला यांचे आदेशाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांनी १ अधिकारी व १० अंमलदार (पो.स्टे. खदान चे ३ व शहर विभागातील प्रत्येक पो.स्टे. मधील ०१ अंमलदार) यांचे पथक तयार करून त्यांचे पथकाला मुलाचे शोध करिता स्वाना होणेबाबत सुचना दिल्या.➤ वरील एस.डी.पी.ओ. पथकातील गिरीष वीर, मंगेश खेडकर, संतोष गावंडे, अनिल भातखेडे, शैलेश घुगे असे एकुण ०५ अंमलदार यांचे पथक मुलाचा शोध घेण्यासाठी नागपुर कोल्हापुर एक्सप्रेस च्या मार्गावर असणारे रेल्वे स्टेशन वाशिम, हिंगोली, वसमत, पुर्णा, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातुर, धाराशिव, पंढरपुर या स्टेशनवरील सर्व सि.सि.टी.व्ही. कॅमेरे चेक करण्यात आले दरम्यान पंढरपुर रेल्वे स्टेशनवरील सि.सि.टी.व्ही. कॅमे-यामध्ये सदर बालक हा रेल्वेमधुन पंढरपुर स्टेशनवर उतरतांना दिसुन आला.> वरील पथकाने बालकाचा पंढरपुर शहरात रेल्वे स्टेशन, विठ्ठल रुख्मणी मंदीर परिसर, बस स्टॅण्ड परिसर, तसेच वेगवेगळ्या मठामध्ये, चंद्रभागा नदीचे काठावर, मुलाचा शोध घेतला तसेच ब-याच लोकांना त्याचा फोटो दाखवुन त्याचे बाबत माहिती घेतली असता माहिती घेतली असता नमुद मुलगा दिनांक ०२/१२/२०२५ चे दुपारी नंतर सरगम चौकातील एस. के. सलुन जवळ दिसुन आला.> विशेष पथकाने तसेच स्था.गु.शा. अकोला पथकाने बालकाचा शोध घेणे संबंधाने एकुण १५० ते २०० सि.सि.टी.व्ही. कॅमेरे तपासुन महत्वपुर्ण माहिती गोळा केली होती.> विशेष पथकाने वाशिम, हिंगोली, परभणी, परळी वैजनाथ, लातुर, धाराशिव, सोलापुर अशा एकूण ०७ जिल्ह्यामध्ये १५०० कि.मी. वा सलग प्रवास करून सदर मुलाचा शोध घेतला. दरम्यान १५० ते २०० इसमांना सदर बालकाबाबत विचारपुस करण्यात आली.सदर कारवाई मध्ये ०४ अधिकारी तसेत २० अंमलदार यांनी कठीण परिश्रम घेवुन कोणताही पुरावा नसतांना, कोणताही साक्षीदार नसतांना, बालकाजवळ मोबाईल नसतांना, आई-वडील, मित्र, शेजारी यांचे कडे कोणतेही पुरक माहिती उपलब्ध नसतांना शोध घेणे हे आव्हाहन ठरले होते. अशा परिस्थीतीत बालकाचा शोध घेवुन बालकास सुखरूप मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला यांचे समक्ष आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अर्चित चांडक सा, जि. अकोला, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री बी. चंद्रकात रेड्डी, सा, जि अकोला, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा शहर विभाग अकोला श्री. सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पो. नि. मनोज केदारे, स.पो.नि. पुरुषोत्तम ठाकरे, पो. स्टे. खदान, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. विष्णु बोडखे, स्था. गु. शा. अकोला एस.डी.पी.ओ. सा. यांचे पथकातील पो. अंमलदार गिरीष वीर, संतोष गावंडे, अनिल भातखेडे, अमर पवार, मंगेश खेडकर, शैलेश पुगे, भुषन मोरे, संदीप काटकर, स्वप्नील वानखडे इंतर तसेच स्था.गु. शा. येथील अमंलदार सुलतान पठाण, फिरोज आन, उमेश पराये, एजाज अहेमद, राज बंदेल, सतिश पवार, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, अशोक सोनवणे स्था. गु. शा. अकोला तसेब विशेष पथकातील यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here