जबरी चोरीतील आरोपीस सहा तासात अटक, आरोपी कडुन नगदी १,२०,०००/-रू सह एकुण १,८०,०००/-रू चा मुददेमाल वा मुददेमाल जप्त खदान पोलीस स्टेशन, ची कारवाई

0
19

अकोला प्रतिनिधी मनीष राऊत दिनांक ०५/१२/२०२५ रोजी सकाळी १०/१५ वाजता चे सुमारास फिर्यादी मुकेश गोपाल बगडीया वय ५१ वर्षे रा. गणेश हाउसिंग सोसायटी गौरक्षण रोड अकोला. हे धरून त्यांचे मोटर सायकल क्रमांक एम एच ३० ए.एस.६०९३ ने त्यांचे घरून नगदी पैसे १,२०,०००/-रू एका पांढ-या बॅगे मध्ये घेवुन जात असतांना चार बंगल्या चे समोर एका अज्ञात इसमाने त्यांचे मोटर सायकल ने फिर्यादी चे मोटर सायकल समोर येवुन त्यांचे हातामधील लाल रंगाची मिरची पावडर फिर्यादी चे डोळयात फेकली असता फि चे डोळयात आग होत असल्याने फि हा डोळे चोळत असतांना त्यांचा फायदा घेवुन त्या अज्ञात इसमाने फिर्यादी चे मोटर सायकल ला लावलेली पांढ-या रंगाची बॅग ज्या मध्ये नगदी १,२०,०००/-रू बॅग फि चे ताब्यात तुन बळ जबरीने हिसकावुन नेली. अश्या फिर्यादी चे जबाणी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खदान, अकोला येथे अप क. १०१६/२०२५ कलम ३०९, (६) भारतीय न्यांय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.सदर गुन्हयाची गंभीरता पाहता सदर चा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच एका अज्ञात इसमाने फिर्यादी चे जवळून बळ जबरीने नगदी पैसे हिसकावुन नेले असल्याने सदर अज्ञात आरोपी शोध घेणे करीता. मा. श्री. पोलीस अधिक्षक अर्जित चांडक सा. यांनी आदेशीत केले की, सदर अज्ञात इसमा चा शोध घेवुन लकरात लवकर हजर करावे, असे आदेशीत केल्याने. पो. अं भुषण मोरे, पो. अं स्वप्नील वानखडे यांनी सदर अज्ञात इसमाचा पोलीस स्टेशन खदान, हददीत व घटनास्थळाचे आजु बाजु चे सी.सी.टि.व्हि. फुटेज पाहणी केली असता एक इसम हा घटनास्थळा वरून इन्कमटॅक्स चौक कडुन जुडीओ कडे त्यांचे मोटर सायकल ने जातांना दिसला. म्हणुन सदर इसमाचा जुडीओ येथे जावुन शोध घेतला असता. सदर अज्ञात इसम हा जुडीओ चे मागच्या बाजुला लिप्ट चे बाजुला मिळुन आला. सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनमोल प्रभाकर पिंजरकर वय ५२ वर्षे हरीसंक्लप अपार्टमेन्ट तरंग तलाव नाशिक रोड नाशिक ह/मु प्रांजली नगर शिवाजी पुतळया जवळ मोठी उमरी अकोला, असे सागीतले म्हणुन सदर इसमास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन ला आणुन आणुन विचारपुस केली असता. सदर चा गुन्हा केला असल्याचे कबुली दिल्याने सदर आरोपी यास अटक करण्यात आली आहे. आरोपी कडुन जबरीने चोरलेली संपुर्ण रक्कम १,२०,०००/-रू सह गुन्हयात वापरलेली मोटर सायकल कि अं ५०,०००/-रू व एक मोबाईल कि अं १०,०००/-रू असा एकुण १,८०,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.सदर ची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री अर्चित चांडक सा. जि अकोला मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री बी. चंद्रकांत रेडडी सा.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील सा यांचे मार्गदशनाखाली पोलीस स्टेशन खदान अकोला येथील पोलीस निरीक्षक मनोज केदारे सपोउपनी संजय वानखडे सपोउपनी दिनकर धुंरधर पोहवा गिरीश विर, पोहवसंतोष गांवडे, पोहव अमर पवार, पोकों रोहीत पवार, पोकॉ स्वप्नील वानखडे, पोकों भुषण मोरे, पोकों मगेश खेडकर, पोकों, संदिप काटकर यांनी सदर ची कारवाई केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here