विवेकानंद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा संपन्न

0
6

भद्रावती तालुका प्रतिनिधी/ सुनिल दैदावार भद्रावती : स्थानिक विवेकानंद विद्यालयात दिनांक १३ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा संपन्न झाला.सन २००२ बॅचच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेऊन इतर बॅचच्या विद्यार्थिनींना सोबत घेऊन हा स्नेहमीलन सोहळा घडवून आणला.या प्रसंगी सध्या विद्यालयात कार्यरत तसेच विद्यालयात सेवा पूर्ण करुन निवृत्त झालेले मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे औक्षण करून सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.मुख्याध्यापक सौ. कल्पना बांदूरकर, श्री किशोर साव, श्री विजय लांबट, श्री अनिल धवस, श्री अजय धात्रक आणि शिक्षक वृंद श्री बळवंत पावडे, सौ आशा गावंडे, श्री दयाकर मग्गीडवार, श्री तुकाराम पोफळे, श्री संजय आगलावे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री बालाजी ताजने, श्री विनोद गावंडे, श्री रामदास ठक, श्री बंडू कांबळे आदि सत्कार मूर्तींचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.माजी विद्यार्थिनी विद्या वांढरे, वैशाली कापटे, प्रज्ञा सहारे, मंगला सतई, किरण जुमनाके आदींनी आपल्या मनोगतातून सर्व शिक्षकांचा गुणगौरव करून विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.सौ. कल्पना बांदूरकर, श्री विजय लांबट, श्री अनिल धवस, सौ आशा गावंडे, श्री दयाकर मग्गीडवार, श्री विनोद गावंडे यांनी सुद्धा उपस्थित माजी विद्यार्थिनींच्या शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देऊन समयोचित मार्गदर्शन केले.श्री दयाकर मग्गीडवार, सुनीता कोहरे, वैशाली कापटे, योगिता मांढरे यांनी सूंदर भावगीते गाऊन वातावरण प्रफुल्लित केले.विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थिनी, त्यांचे कुटुंबीय यांचा सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.विशेष म्हणजे याप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा खोटा खोटा वर्ग भरवून, खोटं खोटं शिकवून, खोटं खोटं रागावून-छडीचा मार देण्यात आला.कार्यक्रमाचे सूंदर असे सूत्र संचालन लीना नागपुरे हिने तर आभार प्रदर्शन वैशाली कापटे हिने केले.सद्यस्थितीत कार्यरत मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच माजी विद्यार्थिनी विद्या वांढरे, उषा मांडवकर, लीना नागपुरे, किरण जुमनाके, प्रज्ञा सहारे, वैशाली कापटे, योगिता मांढरे, ललिता जिल्लेवार आदींनी परस्पर समन्वयाने हा स्नेहमीलन सोहळा यशस्वीरीत्या घडवून आणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here