महापालिका निवडणूक ; ८० जागांसाठी रणसंग्राम सुरू १५ जानेवारीला मतदान; १६ जानेवारी मतमोजणी

0
8

अकोला, दि. १५ :राज्य निवडणूक आयोगाने अखेर अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या ८० नगरसेवकांसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच, आजपासून १५ डिसेंबर पासून आदर्श आचारसंहिता त्वरित लागू झाली आहे.पावणे चार वर्षांपासून रखडलेल्या अकोला महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. या निवडणुकीसाठी २० प्रभागातून ८० नगरसेवक निवडले जाणार आहेत. ५ लाख ५० हजार मतदार या निवडणुकीत नगरसेवकांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. शहराला एकूण २० प्रभागांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागातून ४ नगरसेवक (एकूण ८०) निवडले जाणार आहेत. या प्रभाग रचनेमुळेनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आज, १५ डिसेंबर २०२५ पासून अकोला महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेमुळे आता कोणतेही नवीन प्रकल्प, योजना किंवा विकासकामांची घोषणा करता येणार नाही. महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.निवडणुकीत चुरस वाढणार असून, राजकीय पक्षांना स्थानिक स्तरावर नवे समीकरण जुळवावे लागणार आहे. यापूर्वीच राज्य निवडणूकनिवडणूक कार्यक्रमनामनिर्देशन पत्र दाखल करणे २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२५उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत ०२ जानेवारी २०२६चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी ०३ जानेवारी २०२६मतदान १५ जानेवारी २०२६मतमोजणी व निकाल १६ जानेवारी २०२६प्रवर्गनिहाय आरक्षणअनुसूचित जाती १४ जागा (महिलांसाठी राखीव २)अनुसूचित जमाती २ जागा (महिलांसाठी राखीव १)नागरिकांचा मागास प्रवर्ग २१ जागा (महिलांसाठी राखीव ११)सर्वसाधारण ४३ जागा (महिलांसाठी राखीव २१)एकूण जागा ८०आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे पुनः संशोधन पूर्ण झाले आहे.प्रचारासाठी केवळ १० दिवस !निवडणूक कार्यक्रमामुळे आता उमेदवारांच्या प्रचाराची खरी कसोटी लागणार आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादीही निश्चित होईल. यानंतर, प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांकडे केवळ १० दिवसांचा अतिशय कमी कालावधी शिल्लक राहणार आहे.या अल्प कालावधीत राजकीय पक्षांना आपल्या सभा, कॉर्नर बैठका आणिथेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. प्रचारासाठी मिळालेला कमी वेळ, यामुळे निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झालेली असताना आणि वरिष्ठ पातळीवर अद्यापही महायुती व आघाडीचा अंतिम निर्णय न झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. या १० दिवसांच्या मर्यादित वेळेत प्रभावी प्रचार करणे, हे उमेदवारांपुढे मोठे आव्हान असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here