
अकोला काटेपूर्णा प्रतिनिधी मनीष राऊतकाटेपूर्णा गावात केवळ सट्ठाच नव्हे तर चक्री गेमसारखा अवैध जुगार प्रकारही खुलेआम सुरू असल्याचे समोर आले आहे. चक्री गेममध्ये आकडे, रंग व पैशांची उघड लिलावपद्धत सुरू असून, हा जुगार प्रकार लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांना व्यसनाधीन करत आहे.स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, चक्री गेम ठराविक वेळेत व ठराविक ठिकाणी सुरू असतो आणि आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस गस्त असतानाही हा जुगार निर्भयपणे चालतो. त्यामुळे सट्ठ्यासोबत चक्री गेमलाही पोलीस संरक्षण व हप्तेबाजी असल्याचा संशय अधिक गडद होत आहे.जर पोलीस कारवाई करायला इच्छुक असते, तर एका दिवसात चक्री गेमचे साहित्य, आकड्यांच्या वही, रोख रक्कम व आयोजक सहज पकडता आले असते. मात्र तसे होत नसल्याने “हप्ते घेतले जात असल्यामुळेच चक्री गेम चालतोय का?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ढग्याच्या देवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात चक्री गेमसारखा जुगार सुरू असणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे गावाची सामाजिक व नैतिक अधोगती होत आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने गुप्त चौकशी, अचानक धाडी व आर्थिक तपास करून सट्ठा-चक्री-पोलीस साटेलोटा आहे का, हे जनतेसमोर स्पष्ट करावे, असे खुले आव्हान ग्रामस्थांकडून दिले जात आहे.







