
अमरावती: अमरावती शहर पोलिस आयुक्तपदाची सूत्रे आज (मंगळवार) आयपीएस अधिकारी राकेश ओला यांनी स्वीकारली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी विश्रामगृह येथे माजी पोलिस आयुक्त अरविंद चवरीया यांच्याशी चर्चा केली आणि नंतर त्यांच्यासोबत पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल झाले.उत्स्फूर्त स्वागत:कार्यालयात पोहोचताच, नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांचे पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, तसेच शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात:माजी पोलिस आयुक्त अरविंद चवरीया यांच्याकडून राकेश ओला यांनी रीतसर पदभार स्वीकारला. शहर पोलिस दलाचे प्रमुख म्हणून अमरावती शहरातील वाढती गुन्हेगारी, वाहतूक समस्या आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आता राकेश ओला यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांचा मागील पोलिस सेवेतील अनुभव शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.नव्या आयुक्तांनी शहरवासियांना शांतता आणि सुरक्षिततेची हमी देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..








