वाशिम नगरपरिषद निवडणूक: भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आज परिमलजी कांबळे यांचा जनसंवाद दौरा

0
7

वाशिम: वाशिम नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीला वेग आला असून, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. अनिल माधवराव केंदळे यांच्या प्रचारार्थ आज, १७ डिसेंबर रोजी शहरात विविध ठिकाणी भव्य जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या दौऱ्यात भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. परिमलजी कांबळे आणि अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष श्री. राजाभैय्या पवार प्रामुख्याने उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून भाजपची विकासकामे आणि भविष्यातील संकल्पना जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.असा असेल प्रचार दौऱ्याचा मार्ग:दौऱ्याचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे: * दुपारी ४.०० वा.: प्रभाग क्र. ४ (माहुरवेश, पंचशील नगर) * दुपारी ५.३० वा.: प्रभाग क्र. ९ (बालाजी मंदिर परिसर) * सायंकाळी ६.३० वा.: प्रभाग क्र. ७ (खामगाव जिन परिसर)या जनसंवाद दौऱ्याला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप शहर व जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, विशेषतः अनुसूचित जाती बहुल भागांतील मतदारांना आकर्षित करण्यावर या दौऱ्यात भर दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here