
वरोरा तालुका प्रतिनिधी विद्या किन्हाके सविस्तर वृत्तआदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह वरोरा येथे व्यक्ती महत्त्व विकास व विद्यार्थी समुदेशन या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले या मार्गदर्शक कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आय.डी. गडमळे गृहपाल मॅडम होत्या.तसेच प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून माननीय पंकज वंजारी सर वर्धा व मा. आशिष मोडक सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वंजारी सर यांनी आपल्या भाषणात संबोधले की विद्यार्थ्यांनी आलेले संधी गमावू नकास्वतःची तुलना नेहमी स्वतःशी करावी व दुसऱ्याशी करून स्वतःला कमी लेखू नये व्यक्तिमत्व विकासासाठी सकारात्मक विचारता स्वीकार करून आत्मविश्वासाने पुढे जावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गडमळे मॅडम नी सुद्धा मुलीनी आपल्या करियर कडे ल लक्ष केंद्रीत करावे असे आपल्या भाषणातून मुलींना मार्गदर्शन केले. आशिष सरांनी सांगितले की लहानपणापासून आपल्या मनावर जे बिंबवले गेले आहे त्याचाच आपण स्वीकार करतो मात्र त्यामागील खरे कारण शोधण्याचा प्रयत्न बहुतांश वेळा करत नाही यातून विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा खडसंग विद्यार्थिनी केले तर आभार प्रदर्शन रागिनी शेंडे या विद्यार्थिनी केले या कार्यक्रमात संपूर्ण विद्यार्थी चा सहभाग व सहयोग होता.






