
मूर्तीजापूर ज्वालादीप करिता: स्वप्निल जामनिक, मूर्तीजापूर.:बांगलादेशात सुरू असलेल्या भीषण हिंसाचारात हिंदू नागरिकांना लक्ष्य केले जात असून, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. इतकेच नव्हे तर भारतीय दूतावासावरही हल्ले आणि दगडफेक करण्यात आली.
बांगलादेशातील या अमानवीय कृत्यांचे तीव्र पडसाद अकोला जिल्ह्यासह मूर्तीजापूर शहरात उमटले असून, आज शहरातील सनातन हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदवला.आक्रमक निषेध मोर्चा आणि घोषणाबाजीशहरातील छावा चौक येथून या भव्य निषेध मोर्चाला सुरुवात झाली.
मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चात हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी बांगलादेश सरकार आणि तेथील कट्टरपंथीयांविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. “बांगलादेश मुर्दाबाद” आणि “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते.
राष्ट्रध्वजाचे दहनहा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. या ठिकाणी आंदोलकांनी बांगलादेशचा राष्ट्रध्वज जाळून आपला निषेध नोंदवला. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू सुरक्षित राहिले पाहिजेत आणि भारतीय दूतावासावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.चोख पोलीस बंदोबस्तआंदोलनाचे गांभीर्य आणि वाढता संताप लक्षात घेता, शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले.”बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.
भारतीय दूतावासावर झालेला हल्ला हा भारताच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे.”— आंदोलक, सनातन हिंदू संघटना







