
ज्वालादीप करिता स्वप्नील जामनिक मूर्तिजापूर प्रतिनिधी
शहरातील मिशनरी काळातील अलायन्स चर्च मुर्तीजापुर येथे मोठया उत्साहात नाताळ सण साजरा करण्यात आला. सकाळी चर्चमध्ये प्रार्थना झाल्यानंतर अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी व सर्व विश्वासणारे ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.शहरातील विविध प्रार्थनास्थळावर नाताळ निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अकोला जिल्हातील मूर्तिजापूर 3 ते 4 असलेल्या चर्चमध्ये आज सकाळी आपल्या पारंपरिक पद्धतीने प्रार्थनासभा पार पडली. धर्मगुरूंनी यांनी उपस्थित समाज बांधवांना प्रभू येशूचा पवित्र संदेश कथन केला. तेलगू नगर येथील समाज बंधून्नी कॅरल रॅली काढून डान्स करून आपल्या भावना लोकांपर्यंत पोहचवल्या. प्रभू येशूच्या जन्माचा देखावा प्रदर्शित करण्यासाठी गव्हानी उभी करण्यात आली होती.सेंट अँड स्कूल ऐतिहासिक चर्चमध्ये नाताळ निमित्त सकाळी प्रार्थना करण्यात आली. यांनी ख्रिस्त जन्मावर प्रवचन दिले. यावेळी ख्रिस्त बंधूभगिनी उपस्थित होते.






