
सर्द रातो की सरगम “ने रसिक मंत्रमुग्ध
अकोट :-अभिजित सोळंके स्थानिक श्रीहरी फुट पार्क येथे अकोट मेलोडी ग्रुप च्या वतीने सांगितिक व सांस्कृतिक महोत्सव ‘सर्द रातो की सरगम” या भव्य दिव्य संगीत मैफील चे आयोजन करण्यात आले होते. संगीत मैफिलीने अकोट वासियांचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. सदर कार्यक्रमाला उपअधिक्षक श्री गजाननराव शेळके, एस पी ऑफीस अकोला चे दिगंबरराव वनारे, नायब तहसीलदार राजेश जी गुरव यांचे मार्गदर्शन लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात नागपूर हून आलेली गायिका सारेगम फेम गौरी शिंदे यांनी भक्ती स्तवन सादर करून झाली, त्यानंतर, ओमप्रकाश डेम्बला, आशिष बारब्दे, अनंत काळे, गणेश बंकूवाले, अरुण सांगलोदकर, प्रताप सोळंके, मोहन सपकाळ, आनंद भोरे, भास्कर वानखडे, डॉ कासट, विजय भीरे, दिपक तळोकार, कन्हैया गौर, विनोदरसे, किरण गुहे, गजानन तायडे, आदित्य गुप्ता, योगेश वर्मा नंदकिशोर शेगोकार, सुनील धुळे, हिम्मत दंदी, संदीप ढोक, डी विशाल इंगोले, कैलास बोरकुटे, सिद्धांत वानखडे, पवन पातुरकर या सर्व मेलोडी ग्रुपच्या गायकांनी एक सेबढकर एक गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी नवनियुक्त नगरसेवक दिलीप भाऊ बोचे व सौ विजयाताई बोचे, टेमझरे, डॉ विशाल इंगोले, कु. चंचल पितांबरवाले यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल माळवे, स्वाती माळवे तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जूनगरे यांनीउपस्थिती लावून कार्यक्रमाच्या यशात भर घातली. कार्यक्रमाचे संचालन मिमिक्री आर्टिस्ट प्रवीण पुंडगे यांनी केली. कार्यक्रमाला प्रतिष्ठित उद्योजक, समाजसेवक, सरकारी कर्मचारी, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला व कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अध्यक्ष योगेश वर्मा, ग्रुप चे सर्व सदस्य, संजय बोरोडे, बाबुरावजी झांबरे, संतोष निमकर, शेतकरी समूहाचे सुरज देठे, अजिंक्य नाथे, अतुल निमकर, अजिंक्य तेलगोटे, दर्शन ठाकुर खूप प्रयत्न केले. कार्यक्रम स्थळी उसळलेली गर्दी रसिकांचा प्रतिसाद आणि टाळ्यांचा गजर यामुळे संपूर्ण परिसर संगीतमय झाले याची चर्चा सर्वत्र होत आहे.






