कठीण प्रसंगाचा सामना साहसाने व धैर्याने करावा :-डॉ सचिन कोठेकर

0
16

अकोट प्रतिनिधी अभिजीत सोळंके :- श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथे वीर बाल दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे तर उपप्राचार्य डॉ. संजय कोल्हे व डॉ. अशोक इंगळे मराठी विभाग व मानव विज्ञान शाखा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉ. सचिन कोठेकर प्रमुख व्याख्याते म्हणून वीर बाल दिवस का साजरा केला जातो, याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांच्या दोन पुत्रांनी साहिबजादा जोरावर सिंग व साहिबजादा फतेह सिंग मुघल सत्तेविरुद्ध धर्म, स्वाभिमान व सत्यासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. या दोन बालवीरांनी मुघलांच्या अन्यायकारक आदेशांना न जुमानता धर्मांतरास नकार दिला व अत्यंत लहान वयात हौतात्म्य पत्करले. त्यांच्या या अद्वितीय शौर्याच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिन’ म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांनी वीर बालकांच्या त्यागाचे महत्त्व विशद करत, अशा महान इतिहासातून विद्यार्थ्यांनी धैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रभक्तीचे संस्कार आत्मसात करावेत, असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमास विज्ञान शाखाप्रमुख डॉ. माणिक ढोरे, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. जी. वाय. वानखडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. संजय पट्टेबहादूर, एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा. अर्चना कुचे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व मोठ्या संख्येने सहभाग लाभला.कार्यक्रमाचे आयोजन अर्थशास्त्र विभाग व रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. के. नन्नावरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश आंधळे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रासायनशास्त्र विभागातील प्राध्यापक, श्री किशोर लाधे, अनुज सिरस्कार विष्णु डिक्कर, अजय खोटरे यांनी विशेष परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here