पोस्टमनच्या घरी सापडली टपालाची चक्क तीन पोती

0
36

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / नरेश राऊत अँकर : ज्यांच्या खांद्यावर नागरिकांचा विश्वास आणि महत्त्वाची कागदपत्रे पोहोचवण्याची जबाबदारी आहे, त्याच डाक विभागाने पांढरकवडात विश्वासार्हतेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे, कायदेशीर नोटीस आणि बँकिंग साहित्य सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या पोस्ट विभागाचा धक्कादायक निष्काळजीपणा पांढरकवडा येथे उघडकीस आला आहे. येथील पोस्टमन सतीश धुर्वे याने कर्तव्यात कसूर करून शेकडो नागरिकांचे टपाल चक्क आपल्या घरी साठवून ठेवल्याचे समोर आले आहे. पोस्टातील पार्सल मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने वरिष्ठांनी पोस्टमनच्या घराची झडती घेतली. यात पार्सलचे घबाडच हाती लागले संबंधित पोस्टमनच्या घरातून टपालाने भरलेली तब्बल तीन पोती ताब्यात घेण्यात आली आहेत.स्थानिक मंगलमूर्ती लेआऊट येथील रहिवासी आणि ज्येष्ठ विधिज्ञ गाजी इबादुल्ला खान यांनी या विषयाची तक्रार केली होती. मागील एक वर्षापासून त्यांना मिळणारी कायदेशीर पुस्तके, नोटीस आणि इतर टपाल मिळत नव्हते. संशयावरून त्यांनी चौकशी केली असता, पोस्टमन सतीश धुर्वे हे टपाल वितरित न करता ते नष्ट करत असल्याचा त्यांना संशय आला. २२ डिसेंबर रोजी धुर्वे कार्यालयात गैरहजर असताना, त्यांच्या उद्धट वर्तणुकीमुळे हा संशय बळावला आणि तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या कारवाईत पोस्टमन सतीश धुर्वे याच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी तिथे जे पाहायला मिळाले, त्याने सर्वांचेच डोळे पांढरे झाले.कृत्यामुळे अनेक तरुणांची नोकरीची कॉल लेटर्स, वृद्धांचे पेन्शन पेपर आणि व्यापाऱ्यांचे धनादेश रखडले असण्याची शक्यता आहे. या गंभीर गुन्ह्यासाठी संबंधित पोस्टमनवर फौजदारी कारवाई करण्याची आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here