मातंग समाजाच्या अ ब क ड आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
28

मुंबई/अकोला –हिंदू मातंग सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मातंग समाजाच्या **अ ब क ड आरक्षणासह विविध प्रलंबित प्रश्नांबाबत** आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री **ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस** यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनामध्ये मातंग समाजाला न्याय मिळावा, आरक्षणाची योग्य अंमलबजावणी व्हावी तसेच समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.निवेदन देताना **हिंदू मातंग सेना अकोला जिल्हाध्यक्ष श्री. गजानन भाऊ आवचार**, **महिला विदर्भ अध्यक्ष सौ. सुषमाताई**, तसेच **हिंदू मातंग सेना संस्थापक अध्यक्ष श्री. गजानन उर्फ तात्या सोनवणे** उपस्थित होते.यावेळी नेत्यांनी मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे शासनाचे लक्ष वेधले असून, शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन स्वीकारून योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.हिंदू मातंग सेना राज्यभर मातंग समाजाच्या हक्कांसाठी लढा देत असून, भविष्यातही समाजहितासाठी आंदोलनात्मक व संघटनात्मक कार्य सुरू ठेवणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here