पोलीस स्टेशन खदान हददीत प्रभावीपणे पेट्रीलींग करून शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विकी करणा-या इसमानवर रेड करून ९,६००/- रूचा माल जप्त

0
17

हकीकत अशा प्रकारे आहे की पोलीस स्टेशन खदान, अकोला दि. २८/१२/२०२५ रोजी पो स्टे परिसरात पेट्रोलींग दरम्याण मिळालेल्या माहिती वरून शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करणारे इसमावर आळा बसण्या करिता तपास पथकास योग्य त्या सुचना देवुन रवाना करण्यात आले असता तपास पथकातील कर्मचारी यांनी शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्हयातील आरोपी नामे बाबुराव भिमराव निशानराव वय ५६ वर्षे रा. अंध विध्यालय जवळ मलकापूर, अकोला यांचे कडुन शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा मोनोकाईट फायटर कंपणीचे १२ बंडल (रिल) प्रत्येकी विक्री किमंत अंदाजे ८०० रू असा एकुण ९,६००/- रू वा माल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही श्री. अर्चीत चांडक, पोलीस अधिक्षक सा. अकोला, श्री. बी. चंद्रकांत रेडडी, अपर पोलीस अधिक्षक सा. अकोला, श्री. सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला, श्री मनोज केदारे पोलीस निरीक्षक पो. स्टे. खदान, अकोला यांचे मार्गदर्शनाखली स. फौ/संजय वानखडे पोहवा / संतोष गावंडे, गिरीश विर, अमरसिंग पवार, पोकों / मंगेश खेडकर, वैभव कस्तूर स्वप्नील वानखडे मपोशी पुजा गाडेयांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here