सोयाबीन खरेदी ग्रेडनुसार करा…या मागणीसाठी शुक्रवारी होणारा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित…राजु वानखडे

0
11
 ज्वालादीप कार्यकारी संपादक विलास सावळे मुर्तीजापुर  

मुर्तिजापूर दि.१( तालुका प्रतिनिधी) यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन च्या दर्जावर मोठा परीणाम झाला असून नाफेड मार्फत सुरू असलेली खरेदी अत्यंत मंद गतीने होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.खुल्या बाजारात सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे एक हजार रुपयाचा फटका बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कापुस खरेदी प्रमाणेच सोयाबीन साठीही सुपर एफ.ए.क्यु फेअर अशा दर्जानुसार खरेदीची पद्धत राबविण्यात यावी अशा मागणीसाठी प्रगती शेतकरी मंडळ जांभा खुर्द.. यांनी करून दि.२ जानेवारी २०२६ शुक्रवारी तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान करीत आप आपला माल ट्रॅक्टर मध्ये भरुन मंडळाच्या आॅफीस समोर भरुन आणावा व तो माल ट्रॅक्टर मध्ये भरुन थेट जुन्या काॅटन मार्केट यार्ड येथे मोर्चा स्वरूपात काढण्याचा निर्णय प्रगती शेतकरी मंडळ जांभा खुर्द चे अध्यक्ष राजु वानखडे यांनी घेतला होता.पण शासनाने तातडीने एक बैठक तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या कार्यालयात आयोजित करून उपस्थित शेतकऱ्यांचा भावना जाणून घेवून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यावर चर्चा करण्यात आली.शेतकऱ्यांनी केलेली मागणी रास्त आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.ही लवकरच केंद्र सरकारच्या दालनात पाठवली जाईल असे आश्वासन योगेश लोटे सहाय्यक निबंधक,धिरज मुळे व्यवस्थापक खरेदी विक्री यांनी दिल्याने दि.२ जानेवारी २०२६ शुक्रवारी होणारा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजु वानखडे यांनी दिली आहे.बैठकीला तहसीलदार शिल्पा बोबडे शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव, तालुका कृषी अधिकारी दिपक तायडे, योगेश लोटे सहाय्यक निबंधक, धिरज मुळे व्यवस्थापक खरेदी विक्री यांची प्रमुख उपस्थिती होती.या सभेला प्रगती शेतकरी मंडळाचे सदस्य राजू वानखडे यांच्या सह शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव म्हसाये, श्रीकृष्ण गुल्हाने,प्रमोद राजंदेकर, नंदकिशोर बबानिया,अभी पोळकट, श्रीकांत वानखडे, मुन्ना नाईकनवरे, अनिल देवगीरकर, कैलास साबळे आदी शेतकरी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here