अकोला पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसिंग’ कडे पाऊल; नागरिकांच्या सेवेसाठी ‘व्हॉट्सअॅप चॅटबॉट’ सुविधेचा शुभारंभ !

0
17

अकोला मनीष राऊत :नागरिक आणि पोलीस दलातील संवाद अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आज महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन 2026 चे औचित्य साधून अकोला पोलीस दलाच्या Akola CopConnect या Whatsapp Chatbot वे उद्याघाटन मा.वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला यांच्या शुभहस्ते आणि मा.अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला. मा. सुनील लहाने, आयुक्त, मनपा अकोला, मा. सुमन सोळंके, DFO अकोला, मा. चंद्रकांत रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, अकोला, मा. परी. सहा. पोलीस अधीक्षक ईशानी आनंद आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 02.01.2025 रोजी करण्यात आले.मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत ‘स्मार्ट पोलिसिंग’ संकल्पनेला गती देण्यासाठी नव्याने आधुनिक AI तंत्रज्ञानचा वापर करून नागरिकांच्या सेवेत AI Whatsapp Chatbot उपलब्ध करण्यात आला.अकोला पोलीस दलाने नागरिकांच्या सोयीसाठी 9403553117 हा अधिकृत व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक जारी केला आहे. या एकाच क्रमांकावर नागरिकांना पोलिसांच्या विविध सेवांची माहिती घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. चॅटबॉटची मुख्य वैशिष्ट्येःपोलीस ठाण्यांची माहिती: जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक, प्रभारी अधिकाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक,ई-मेल, सोशल मीडिया अकाउंट्स आणि गुगल लोकेशनची माहिती.ऑनलाईन तक्रार सुविधा: Whatsapp वर ऑनलाईन तक्रार नोंदणी व सद्यस्थिती तपासणी करण्याची सुविधा।17 प्रकारच्या सुविधाः ई-चालान भरण्याची सुविधा, पासपोर्ट पडताळणी (Passport Verification) आणि चारित्र्यपडताळणी (Character Verification) संदर्भात मार्गदर्शक माहिती, कार्यक्रम माहिती तसेच इतर आवश्यक सेवांची माहिती.द्विभाषिक सुविधाः हा चॅटबॉट मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, वापरण्यास अत्यंत सोपा आहे.२४/७ उपलब्धताः ही माहिती नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध राहील.कसा वापर करावा?१. आपल्या मोबाईलमध्ये 9403553117 हा क्रमांक सेव्ह करा.२. व्हॉट्सअॅपवर जाऊन या क्रमांकावर ‘Namaskar’, ‘Hello’ किंवा ‘Hi’ असा मेसेज पाठवा.३. त्यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय येईल. भाषा निवडल्यानंतर विविध सेवांची यादी समोर दिसेल.मा.पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक (IPS) यांच्या मार्गदर्शनात PI अनिल जुमळे, API मनिषा तायडे, पोस्टे सायबर, चि. भूषण अरुण रंभापुरे तसेच श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोला येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाचे विद्यार्थी गौरव पवार, महेश डोंगरे, गौरी चेटुले, भावेश खोसे, जव्वाद बेग यांनी अतिशय परिश्रम घेऊन आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून ‘Akola CopConnect’ चॅटबॉटची निर्मिती करण्यासाठी मोलाचे योगदान केले. उद्घाटन सोहळ्यात सर्व पोलीस विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती. तरी अकोला पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ‘Akola CopConnect’ चॅटबॉटचा अधिकाधिक वापर करून या सुविधेचा वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here