पदग्रहणानिमित्त नगराध्यक्ष सोनू भाऊ बोरेले यांचा आर्य वैश्य समाजाकडून सत्कार

0
12

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- नरेश राऊत पांढरकवडा :- भाजपकडून नगराध्यक्षपदी निवडून आलेले मा. सोनू भाऊ बोरेले यांचा आर्य वैश्य समाज, पांढरकवडा यांच्या वतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने सत्कार करून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमास आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र नारलावार, सहसचिव श्री. कुणाल येरावार यांच्यासह समाजबांधव श्री. सुनील बोकीलवार, श्री. सुनील ताम्मेवार, श्री. संजय बुक्कावार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष सोनू भाऊ बोरेले यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी समाजाच्या वतीने अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली की, नगराध्यक्ष सोनू भाऊ बोरेले यांच्या नेतृत्वाखाली पांढरकवडा शहराचा सर्वांगीण विकास होईल. शहरातील नागरी सुविधा, पायाभूत विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.नगराध्यक्ष सोनू भाऊ बोरेले यांनी समाजाच्या सदिच्छा स्वीकारत सर्व घटकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी आर्य वैश्य समाजातील सर्व सदस्यांनी त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत पांढरकवडा शहराच्या प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here