लढ्यातून नेतृत्वाकडे : राम जोशी यांचा संघर्षमय प्रवास, स्वीकृत नगरसेवक म्हणून शहरभर गौरव

Jwaladeep News

January 15, 2026

शिवसंग्राम संघटनेपासून सुरू झालेला राम जोशी यांचा राजकीय प्रवास कधीही सोपा नव्हता. संघर्ष, आंदोलनं आणि अन्यायाविरोधातील थेट लढाई हा त्यांच्या राजकारणाचा आत्मा राहिला आहे. केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता, अन्यायाच्या विरोधात प्रसंगी प्रशासनाशी दोन हात करण्याची भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतली.

नगरपरिषद प्रशासनाविरोधात काढलेली प्रेतयात्रा, अधिकाऱ्यांच्या तोंडावर शाई फेकून व्यक्त केलेला जनतेचा संताप, तसेच विविध आंदोलनं व निवेदनांमधून त्यांनी नेहमीच सामान्य नागरिकांचा आवाज बुलंद केला. राजकारण म्हणजे सुरक्षित चौकटीत उभं राहणं नव्हे, तर गरज पडल्यास जीव धोक्यात घालून अन्यायाविरोधात उभं राहणं असतं, हे राम जोशी यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आहे.

आलेला हा लढवय्या कार्यकर्ता आजही आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करता उभा आहे. गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे, हॉस्पिटल, बँक, शासकीय कार्यालये अशा विविध ठिकाणी सामान्य माणसाच्या अडचणी सोडवणारे राम जोशी हे शहरात ‘मदतीचा विश्वास’ म्हणून ओळखले जातात.

मित्रांच्या सुख-दुःखात सिंहाचा वाटा उचलणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे राम जोशी आज अधिकृतपणे स्वीकृत नगरसेवक झाल्याने शहरभर आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल शहरातील विविध भागांमध्ये, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे.

राम जोशी — संघर्षाची ओळख, जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाची नवी जबाबदारी

संघर्षातून उभा राहिलेला, जनतेसाठी झटणारा आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाचा आदर्श जपणारा हा चेहरा आता नगरसेवक म्हणून शहराच्या विकासात अधिक प्रभावी भूमिका बजावेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment