अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान; अधिवेशनात काय घडणार?

0
36

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदी कोण असणार याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. महाविकासाआघाडीकडून विरोधी पक्षनेते पदाची मागणी करण्यात आली आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदावरुन एक महत्त्वाचे विधान महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र […]

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदी कोण असणार याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. महाविकासाआघाडीकडून विरोधी पक्षनेते पदाची मागणी करण्यात आली आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदावरुन एक महत्त्वाचे विधान महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेता असणार का, असा प्रश्न सतत उपस्थित होत असतो. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाने विरोध पक्षनेतेपदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पॅटर्ननुसार विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. आता यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठे विधान केले आहे.

महाविकासआघाडीतील कोणत्या पक्षांकडून अद्याप विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्ताव आलेला नाही. पण प्रथेनुसार प्रस्ताव आल्यानंतर अध्यक्ष म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. विरोधी पक्षनेतेपद नियमानुसार दिले जाईल. त्याबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदासाठी आवाज दाबण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही. तर तसा प्रयत्न असता संख्याबळ नसतानाही विरोधकांना कामकाज सल्लागार समितीत स्थान देण्यात आलं नसतं. संख्या नसली तरी विरोधकांचा आवाज ऐकला जाईल. संसदीय लोकशाहीला कुठेही गालबोट लागणार नाही. विरोधकांना भूमिका मांडायला योग्य संधी दिली जाईल. अध्यक्ष म्हणून न्यायबुद्धीने मी वागणूक देईन, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here