Amit Deshmukh : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील तिनही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत..
यातच आज (११ जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील फुटीसंदर्भातील चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे..
दरम्यान, महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या ठाकरे गटाच्या घोषणेनंतर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसची भूमिका काय? यावर काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘काँग्रेस देखील आपआपल्या परीने निवडणुकीची तयारी करत आहे’, अशी सूचक प्रतिक्रिया अमित देशमुख यांनी दिली. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते…