Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्…; अमरावती हादरली

0
3

अमरावती : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभू कॉलनी परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  पत्नीचा मृतदेह घरात दडवून पती पसार झाला आहे. पोलिसांकडून पतीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे अमरावती शहरात (Amravati Crime News) मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री अक्षय लाडे ही विवाहित युवती पती अक्षय सोबत वादविवाद झाल्याने माहेरी राहायला आली होती. काल रात्री सायंकाळी ती प्रभू कॉलनी येथे दुचाकी वाहनाने कपडे आणायला गेली. मात्र, रात्रभर घरी न आल्याने भाग्यश्रीच्या आईने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. फ्रेजरपुरा पोलिसांच्या पथकाने तातडीने दखल घेत भाग्यश्रीचा फोन ट्रेस केला असता भाग्यश्रीचे दुचाकी वाहन हे रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले. त्यातच तिचा फोन देखील होता. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता  त्यात सदर वाहन हे भाग्यश्रीचा पती अक्षय लाडे यानेच रेल्वे स्टेशनपर्यंत आणल्याचे निष्पन्न झाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here