आई अन् बायकोपुढे अभिनेत्याचं काही चालेना; अखेर घासावी लागली भांडी, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली खंत

0
24
घरातील राजकारण कोणाला चुकलंय का? असं दु:ख एका अभिनेत्याने व्यक्त केलं आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत चक्क आई अन् बायकोबद्दल चाहत्यांजवळ तक्रार केली आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेच्या निकालाची चर्चा सुरु असताना घरातील राजकारणाचा व्हिडीओ एक अभिनेत्याने शेअर केल आहे. अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत आई आणि बायकोच्या युतीपुढे स्वत:ची झालेली अवस्था आणि त्यामुळे घरात त्याला मिळणारी वागणूक याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

हा अभिनेता आहे हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप. घरातील आई-बायकोच्या राजकारणाचा मजेशीर व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. सासू-सुनेच्या बॉण्डिंगचा परिणाम नवऱ्यावर कसा होतो हे अभिनेत्याने या मजेशीर व्हिडीओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

पृथ्वीक नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. 25 ऑक्टोबरला लग्नाचा फोटो शेअर करत अभिनेत्याने सर्वांना सुखद धक्का दिला होता. त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण प्राजक्ता वायकुळशी पृथ्वीकने लग्न केलं आहे.

पृथ्वीक आणि प्राजक्ता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर त्यानंतर एका मुलाखतीत, माझ्या आईचं आणि प्राजक्ताचं म्हणजे पत्नीचे आधीपासून खूप सुंदर बॉण्डिंग असल्याचं पृथ्वीकने सांगितलं होतं. याची प्रचिती त्याच्या चाहत्यांना पृथ्वीकने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओतून आली असणार आहे. या व्हिडीओला त्याने “घरचं राजकारण कोणाला चुकलंय?” असं कॅप्शनही दिलं आहे.

पृथ्वीक प्रतापने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची आई आणि पत्नी आप-आपल्या मोबाइलमध्ये काहीतरी बघण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं. त्या दोघींना पाहून पृथ्वीकने “घरामध्ये सासू-सून महायुती आघाडीवर” असं कॅप्शन दिलं आहे.

पत्नी आणि आई मोबाइलमध्ये गुंग असल्याचं पाहताच पृथ्वीक किचनच्या दिशेने जातो आणि तोंड पाडून भांडी घासण्यास सुरुवात करतो. या प्रसंगाला त्याने “आणि वंचित नवरदेव पिछाडीवर” असं कॅप्शन दिलं आहे.

पृथ्वीकच्या या व्हिडीओवर प्रियदर्शिनी अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.तसेच चाहत्यांनी देखील, या व्हिडीओवर कमेंट करत त्याची मजा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. एका चाहत्याने लिहिले आहे ,“अरेरे काय ही अवस्था”,तर एकाने लिहिले आहे “नाइस वन पीपी”, “घर घर की कहाणी” अशा मजेशीर कमेंट्स करत चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here