Deepika Padukone Comeback : सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे. दीपिका लवकरच कामावर परतणार आहे. दीपिका पदुकोण लवकरच सेटवर परतणार असून शुटींगला सुरुवात करणार आहे. मुलीच्या जन्मानंतर दीपिकाने कामातून ब्रेक घेतला होता, सध्या ती लेक दुआचं संगोपन करण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता ती लवकरच शुटींगला परतणार आहे. दीपिका पदुकोण दमदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांमध्ये ती सेटवर परतून चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. दीपिका पदुकोण आता लवकरच बॉक्स ऑफिसवर घरवापसी करणार आहे.
मॅटरनिटी ब्रेकनंतर दीपिका करणार दमदार कमबॅक
अभिनेत्री दीपिका पदुकोण शेवटची सिंघम रिटर्न्स चित्रपटात झळकली होती. मात्र, मुलीच्या जन्मानंतर तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. यामुळे ती सिंघम रिटर्न्स चित्रपटाच्या प्रमोशनलाही गैरहजर होती. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकर कल्की एडी 2898 पार्ट 2 च्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे. 2024 मध्ये रिलीज झालेला कल्की एडी 2898 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जगभरात दमदार कमाई केली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच या चित्रपटाच्या सीक्वेलच्या शुटींगला सुरुवात होईल, अशी माहिती आहे.