Devendra Fadnavis on Ajit Pawar : अनेक दशके अजित पवार अशा विचारधारेसोबत आहेत, जे धर्मनिरपेक्ष आणि हिंदू विरोधी आहेत. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणारे वास्तविक धर्मनिरपेक्ष नाहीत, अशा लोकांसोबत अजितदादा राहिले आहेत. त्यांच्यासाठी हिंदुत्वाला विरोध हीच धर्मनिरपेक्षता असल्याचे फडणवीस म्हणाले.
राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगा आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे या वादावर अजित पवार यांना सुनावले आहे. अनेक दशके अजित पवार अशा विचारधारेसोबत आहेत, जे धर्मनिरपेक्ष आणि हिंदू विरोधी आहेत. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणारे वास्तविक धर्मनिरपेक्ष नाहीत, अशा लोकांसोबत अजितदादा राहिले आहेत. त्यांच्यासाठी हिंदुत्वाला विरोध हीच धर्मनिरपेक्षता असल्याचे फडणवीस म्हणाले.
त्यांना जनतेचा मूड…
त्यांना जनतेचा मूड समजायला थोडा वेळ लागेल. लोक एकतर जनतेच्या भावना ओळखू शकले नाही अथवा या वक्तव्याचा अर्थ समजू शकले नाहीत. अथवा त्यांना बोलताना काही तरी वेगळंच सांगायचं होतं, असं वक्तव्य फडणवीस यांनी अजितदादांचा उल्लेख करताना केला. त्यांनी बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे या मुद्दावर अजितदादा आणि फडणवीस यांचे एकमत नसल्याचे समोर आले आहे.