Hardik Pandya : ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तोडफोड खेळी करत बडोद्याला विजयी केलं.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना पर्थ येथे खेळत आहे. टीम इंडियाने या सामन्यातील दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा (23 नोव्हेंबर) खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 218 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग नसलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी 2024 या स्पर्धेत धमाकेदार बॅटिंग करुन साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांच्या शतकी खेळीनंतर आता ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने गुजरातविरुद्ध स्फोटक खेळी करत बडोद्याला 5 विकेट्सने विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.
अक्षर पटेल याच्या नेतृत्वात गुजरातने बडोद्यासमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बडोद्याने हे आव्हान हार्दिकच्या नाबाद स्फोटक खेळीच्या जोरावर 5 विकेट्स गमावून 19.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बडोदाने 188 धावा केल्या. हार्दिक पंड्या याने विजयात सर्वाधिक 74 धावांचं योगदान दिलं. हार्दिक नाबाद परतला. हार्दिकने 35 चेंडूमध्ये 211.43 च्या स्ट्राईक रेटने 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नॉट आऊट 74 धावा केल्या. हार्दिकने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 11 चेंडूत 54 धावा कुटल्या.
हार्दिक व्यतिरिक्त बडोद्यासाठी शिवालिक शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. शिवालिकने 43 बॉलमध्ये 64 रन्स केल्या. शिवालिकने या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकार ठोकले. तसेच इतर फलंदाजांनीही छोटेखानी खेळी करत विजयात हातभार लावला.
📽️ WATCH
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 23, 2024
Hardik Pandya shows his class with match-winning 74*(35) 🔽https://t.co/D8Pkujq2HF #SMAT | @IDFCFirstBank pic.twitter.com/XlQU4kmhpS
बडोदा प्लेइंग ईलेव्हन : कृणाल पंड्या (कर्णधार), मितेश पटेल (विकेटकीपर), भानू पानिया, विष्णू सोलंकी, हार्दिक पंड्या, निनाद अश्विनकुमार रथवा, शिवालिक शर्मा, महेश पिठिया, राज लिंबानी, लुकमान मेरीवाला, अतित शेठ
गुजरात प्लेइंग इलेव्हन : अक्षर पटेल (कर्णधार), आर्या देसाई, उर्विल पटेल (विकेटकीपर), सौरव चौहान, उमंग कुमार, रिपल पटेल, हेमांग पटेल, चिंतन गजा, रवी बिश्नोई, अरझान नागवासवाला आणि तेजस पटेल.