HMPV Virus : कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा जग एचएमपीव्ही व्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या चीनमधील व्हायरसमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले. त्यानंतर आता नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागसह (Maharashtra Health Department) सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. हा व्हायरस धोकादायक नाही, त्याचबरोबर याच्या उपचार पद्धती माहिती आहेत, घाबरून जाऊ नका. सावध रहा, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऑनलाईन पध्दतीने संवाद साधणार आहेत.
Home Uncategorized HMPV Virus : HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी...