भारतीय संघ पहिल्या कसोटीत मजबूत स्थितीत दिसत आहे. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने चांगली सुरुवात करून दिली आहे. आता तिसऱ्या दिवशी काय होते याकडे लक्ष लागून आहे. असं असताना मिचेल स्टार्कच्या खेळीने लक्ष वेधून घेतलं आहे.
भारताने दुसऱ्या डावात बिनबाद 172 धावांची खेळी केली आहे. त्यात पहिल्या डावातील 46 धावांची आघाडी मिळवली तर दुसऱ्या दिवशी 218 धावा झाल्या आहेत. यशस्वी जयस्वालने नाबाद 90 आणि केएल राहुलने नाबाद 62 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल शतकी खेळी करतो का? हे तिसऱ्या पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. असं असताना मिचेल स्टार्कच्या खेळीची चर्चा रंगली आहे.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया 7 बाद 67 धावांच्या पुढे खेळत होता. 79 धावा असताना नववी विकेट पडली. पण त्यापुढे मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड जोडीने 25 धावांची भागीदारी केली. पण मिचेल स्टार्कची शतकी सर्वांच्या लक्षात राहिली. नवव्या क्रमांकावर उतरलेल्या मिचेल स्टार्कने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं.
मिचेल स्टार्कने शतकी खेळी म्हणजे 100 हून अधिक चेंडूंचा सामना केला. बचावात्मक खेळी करताना मिचेल स्टार्कने 112 चेंडूंचा सामना केला. नवव्या क्रमांकावर उतरून इतक्या चेंडूचा सामना केला आणि ऑस्ट्रेलियाला 100 धावांच्या पार पोहोचवण्यास मदत केली.
मिचेल स्टार्कची चिवट खेळी पाहून भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागला. आधी जसप्रीत बुमराह आणि हार्षित राणाने विकेट काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिराज आणि नितीशकुमार रेड्डीने प्रयत्न केला. मग वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली. यश येत नसल्याचं पाहून पुन्हा जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आणि साथीला हार्षित राणाला संधी दिली. अखेर हार्षित राणाने विकेट काढली.
मिचेल स्टार्कने 112 चेंडूंचा सामना करत 2 चौकारांसह 26 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाला 104 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाने 46 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली.