International Thank You Day : आजचा ‘हा’ खास दिवस आपल्या प्रियजनांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो

0
4

  दरवर्षी 11 जानेवारी रोजी ‘आंतरराष्ट्रीय आभार दिन’ उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. नव्या वर्षाच्या सुरुवातीला हा दिवस साजरा करण्यामागे उद्दिष्ट एकच आहे – धन्यवाद म्हणण्याचे महत्त्व अधोरेखित करणे.

आपण अनेकदा धन्यवाद म्हणायला विसरतो, कारण आपण ते गृहीत धरतो किंवा आपल्याला कसे वाटते हे इतरांना माहीत असल्याचे समजतो. आभार व्यक्त करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय आभार दिनाची सुरुवात करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय आभार दिनाचा इतिहास

प्राचीन काळातही कृतज्ञता व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. इजिप्शियन लोक पपिरसवर लिहून संदेश पाठवत असत, तर चिनी लोक कागदाचा वापर करीत. या संदेशांमध्ये शुभेच्छा, नवीन वर्षाचे स्वागत आणि कृतज्ञतेचे शब्द असत. ‘धन्यवाद’ या संज्ञेचा उगम ४५० ते ११०० च्या काळात झाला. जुन्या इंग्रजीमध्ये याचा अर्थ “विचार” असा होता. कालांतराने, ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने त्याचा अर्थ ‘अनुकूल भावना, सद्भावना’ असा स्पष्ट केला.

1400 च्या दशकात युरोपमध्ये ग्रीटिंग कार्ड पाठवण्याची प्रथा लोकप्रिय झाली. कुटुंबीय आणि मित्रांनी हस्तलिखित संदेश देऊन आभार व्यक्त करणे सुरू केले. या परंपरेतूनच धन्यवाद नोट्सच्या संकल्पनेचा जन्म झाला. पुढे, जर्मनीतील लुई प्रांग यांनी 1873 मध्ये अमेरिकेत ख्रिसमस ग्रीटिंग कार्ड्स बनवण्यास सुरुवात केली. यानंतर ख्रिसमस आणि धन्यवाद कार्ड्सचा उपयोग वाढत गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here