Maharashtra Politics : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?

0
2

Dhananjay Munde Resignation Demand : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात असून त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे. त्याचबरोबर पोलीस चौकशीतील कथित अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. दरम्यान, या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडी आणि विशेष पथकाकडे सोपवण्यात आला आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात ६ आरोपी अटकेत

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संतोष देशमुख हत्याप्रकरण पहिली मोठी अग्निपरीक्षा आहे. आरोपी वाल्मिक कराडला आत्मसमर्पण करण्यासाठी २० दिवस का लागले, हत्याप्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार का आहे, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here