तिघांनी चाकुने भोसकले: पानटपरीनजिक मित्रासोबत होता उभा
मरावती : गाडगेनगर परिसरात येणाऱ्या शोभानगर परिसरात पानटपरीनजिक मित्रासोबत बोलत उभा असलेल्या १९ वर्षीय तरूणावर तिघांनी अचानक हल्ला करून त्याचा खून केला. या जीवघेण्या हल्ल्यात तो तरूण घटनास्थळीच दगावला. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रोहित रतन पाल (१९, रा. मांडवा झोपडपट्टी) असे मृताचे नाव आहे.
रोहित त्याच्या मित्रांसोबत पानटपरी जवळ उभा असतांना तीन हल्लेखोरांनी रोहितवर अचानक हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता कि रोहितचा जागीच मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत