Salman Khan Security : बुलेटप्रूफ खिडकी, घराबाहेर चौकी! सलमान खानच्या जीवाला धोका, घराबाहेरील सुरक्षा पुन्हा वाढवली

0
3

Salman Khan House Security : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सलमान खानच्या मुंबईतील घराला बुलेट प्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत. वांद्रे येथील सलमान खानच्या घराच्या खिडक्या आणि बाल्कनीला बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय फेन्सिंग आणि हायटेक कॅमेरे देखील बसवण्यात आले आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीनंतर सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने त्याला सुरक्षा पुरवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

बुलेट प्रूफ काचा आणि पोलीस चौकी

सलमानच्या वांद्रे येथील घराच्या खिडक्यांना बुलेट प्रूफ बनवण्यात आले असून, उच्च तंत्रज्ञान सुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत. इतकंच नाही तर तिथे हाय रिझोल्युशनचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. घरासमोरच पोलिसांनी चौकी केली आहे. सलमान खानच्या जवळचे मित्र माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. यासाठी 17 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, असा खुलासा 4 हजाराहून अधिक पानांच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. याशिवाय लॉरेन्स बिश्नोईच्या सलमान खानला मारण्यासाठीही प्लॅन आखला होता.

सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा पुन्हा वाढवली

बाबा सिद्दीकी खून प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने हत्येच्या 85 दिवसांनंतर सोमवारी विशेष मकोका न्यायालयात 4590 पानांचे आरोपपत्र दाखल केले. वेगवेगळ्या राज्यांतून अटक केलेल्या 26 आरोपींविरुद्ध आणि तीन फरार आरोपी शुभम लोणकर, जीशान अख्तर आणि अनमोल बिश्नोई यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात एकूण 180 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here