Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…

0
3

मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर आता महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी महाविकास आघाडीला घराचा आहेर दिलाय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेना आणि काँग्रेसला टोला लगावलाय. तर विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महाविकास आघाडीच्या पराभवाला  जागावाटप कारणीभूत ठरल्याचे म्हटले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

संजय राऊत म्हणाले की, जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीने लांबवली गेली त्याची गरज होती का? ती का, कोणामुळे आणि कशी लांबली? हे बहुतेक वडेट्टीवार यांना माहीत असावे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटप संपलेलं नव्हतं, हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीमध्ये जागावाटप इतक्या विलंबाने झाले तर एक अस्वस्थता पसरते. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. महायुतीमध्ये दोन महिन्यांपूर्वीच जागावाटप संपलेलं होतं. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्या आहेत आणि त्या स्वीकारल्या पाहिजे. चुकीच्या पद्धतीने जागा वाटप झाले हे आता आम्हाला कळत आहे. तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here