Women Candidates Maharashtra Assembly Election 2024 : लाडक्या बहिणींच्या राज्यात महिला उमेदवारांची संख्या कमी; महायुती आणि मविआकडून किती महिला उमेदवारांना संधी?

0
54

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील महिला उमेदवारांची यादी: महाराष्ट्राच्या 67 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 461 महिला आमदार निवडून आल्या आहेत. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत 250 हून अधिक महिला उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 4,136 उमेदवार निवडणूक लढवणार असून, त्यापैकी केवळ 6 ते 7 टक्के महिला उमेदवार आहेत.

पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार किती?

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात १००० पुरुषांमागे ९२९ महिला मतदार आहेत. तर, २०१९ मध्ये हा रेशो ९२५ पर्यंत घसरला. तसंच, २०२४ मध्ये १००० पुरुष मतदारांमागे ९३६ महिला मतदार आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर, ५ कोटी २२ लाख ७३९ पुरुष मतदार आहेत.

एकूण लाडकी बहीण योजनेसारख्या असंख्य योजना राज्यातील सरकारने आणलेल्या असताना, महिला केंद्रीत निवडणुका होत असल्या तरीही राज्यातून महिला उमेदवारांना संधी देण्यास पक्षांकडून आजही हात आखडता घेतला जात आहे. तसंच, अपक्ष महिला उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छूक नसल्याचं समोर येत आहे.

महायुती सरकारमध्ये महिलांना मंत्रिमंडळात फारसे प्रतिनिधित्व दिले गेले नाही. शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या. त्यामुळे, भारत निवडणूक आयोगाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण 4,136 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये सुमारे 250 महिला उमेदवार असून महायुती व महाविकास आघाडीने प्रत्येकी 30 महिला उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपने 18 महिलांना, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) 8 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चार महिलांना तिकीट दिले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 11 महिला उमेदवारांना, तर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) 10 आणि काँग्रेसने 9 महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here