यशस्वी जैस्वाल शतक: यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विक्रमी शतक झळकावले आहे. यासह यशस्वीने इतिहास रचला आहे.
टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर यशस्वी जैस्वालने पर्थ स्टेडियमवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. यशस्वीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पदार्पणाच्या सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. यशस्वीने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात केएल राहुलसोबत द्विशतकी सलामीसह वैयक्तिक शतक झळकावले आहे. यशस्वीचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. या शतकासह यशस्वीने खास आणि प्रतिष्ठेच्या यादीत स्थान मिळवले आहे.
यशस्वीने दुसऱ्या डावातील 62 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जोश हेझलवूडला षटकार ठोकून शतक पूर्ण केले. या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मालिकेतील यशस्वीचे हे चौथे शतक होते. यशस्वीसह, तो या WTC मालिकेत सर्वाधिक शतके करणारा पहिला भारतीय ठरला. तसेच यशस्वी ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा चौथा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियात सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
ऑस्ट्रेलियातील युवा भारतीय शतकवीर
सचिन तेंडुलकर – 1992, वय – 18 वर्ष 253 दिवस
ऋषभ पंत – 2019, वय 21 वर्ष 91 दिवस
दत्त फडकर – 1948, वय 22 वर्ष 42 दिवस
यशस्वी जयस्वाल – 2024, वय 22 वर्ष 330 दिवस
द्विशतकी सलामी भागीदारी
दरम्यान टीम इंडियाने पहिल्या डावातील 46 धावांच्या आघाडीसह अप्रतिम सुरुवात केली. यशस्वी आणि केएल राहुल या सलामी जोडीने 201 धावांची भागीदारी केली. यशस्वीने या दरम्यान शतक झळकावलं. केएलकडेही शतकाची संधी होती, मात्र त्याचं शतक हुकलं. यशस्वी 176 बॉलमध्ये 5 फोरसह 77 धावा केल्या.
यशस्वीचा सिक्स आणि ऑस्ट्रेलियातील पहिलं शतक
What a knock.#AUSvIND pic.twitter.com/nCEzVaY48J
— cricket.com.au (@cricketcomau) November 24, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.